महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळेत ‘एक राज्य,एक गणवेश’ (Maharashtra School Uniform) ही योजना सुरु केली होती.या योजनेत आता राज्यसरकारकडून नवे बदल करण्यात आले आहेत. गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आले असून विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित गणवेश पुरवठा होणार आहे. तर स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे रोजगार मिळणार असल्याने पूर्वीपासून सुरु असलेले नियम आता बदलण्यात आले आहेत. यासंदर्भात माजी मंत्री दिपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
माजी मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, मी त्या खात्याचा माजी मंत्री होतो. निदान बदल करण्याच्या आधी मला विचारायला हवे, मी आता मंत्री नसलो म्हणून काय झाले?, असा सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी योजना राबवायची असेल तर त्यासाठी एखाद वर्ष जावे लागते, आता त्या महिलांनी घेतलेल्या मशिनरी आणि केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे काय होणार?, निधान त्यांचा तरी विचार करायला हवा होता. सध्या या खात्याचे मंत्री नसल्यामुळे कोणाला विचारणार, म्हणूनच मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आणि हे बदल करू नका असे सांगणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) दिली.
Maharashtra School Uniform Scheme: ‘एक राज्य, एक गणवेश’योजनेत नवे बदल
शिवसेनेचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी ‘एक राज्य,एक गणवेश’ ही योजना सुरु केली होती. मात्र ही योजना वादात सापडल्याने विरोधकांकडून अनेक प्रकारच्या टीका होऊ लागल्या. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असताना मात्र मंत्रीपदाची संधी हुकली. त्यामुळे दिपक केसरकर हे नाराज असल्याचं चित्र दिसत आहे.