-1.7 C
New York

Barak Obama : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्या पसंतीत भारताचा ‘हा’ सिनेमा

Published:

पायल कपाडिया यांनी दिग्दर्शित केलेला ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ (All We Imagine as Light) हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. या सिनेमासोबतच भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies) हा सिनेमाही शर्यतीत होता. एवढेच नव्हे तर लापता लेडीज ऐवजी पायल कपाडिया हाच सिनेमा ऑस्करसाठी पाठवायला हवा होता, असे अनेकांचे म्हणणे होते. याशिवाय मे महिन्यात झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही या सिनेमाने बाजी मारली होती. अशातच आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनीही त्यांच्या आवडत्या सिनेमांची यादी हल्लीच प्रदर्शित केली आहे. या यादीमध्ये पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट या सिनेमाचेही नाव आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या सोशल मीडियावरुन ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यात 2024 मध्ये बराक ओबामा यांनी भारतीय सिनेमाला पहिली पसंती दिली आहे. तसेच या यादीमध्ये ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट, कॉनक्लेव्ह, द पियानो लेसन, द प्रॉमिस्ड लँड, द सीड ऑफ द सॅक्रेड फिग, ड्यून: पार्ट टू, अनोरा, Dìdi, शुगरकेन, अ कम्प्लिट अननोन या सिनेमांचा समावेश आहे.

Maharashtra School Uniform Scheme:’मी आता मंत्री नसलो म्हणून काय झाले?’,दिपक केसरकरांची नाराजी

ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट या चित्रपटाने कान्स फेस्टिव्हमध्ये पाल्मे डी’ओर हा पुरस्कार मिळवला होता. हा पुरस्कार मिलवणारा हा चित्रपट 30 वर्षातील पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. यासोबतच या सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स जिंकून इतिहास रचला. शिवाय या सिनेमाला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब ही की ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला एकूण दोन नामांकने मिळाली असून दुसरी एक सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर – (इंग्रजी नसलेली भाषा) साठी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img