2.1 C
New York

Santosh Deshmukh Murder Case : ‘दोषींवर मोक्का कायदा लावणार’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Published:

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. याप्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशात उमटताना दिसत आहेत. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून सलग दोन दिवसांपासून हा मुद्दा सभागृहात गाजत नाही. भाजपचे सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भुमिका स्पष्ट केली आहे. तर देशमुख कुटुंबियाला १० लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येईल.अशी देखील ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

मस्सजोग मध्ये पवनचक्की उभारण्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला आणि प्रोजक्ट अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. वाल्मिक कराड याने धमकी दिल्याचे समोर आलं.त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.या संपूर्ण प्रकरणांमध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी देखील सुरु आहे. जो काही गुन्हा घडला आहे, याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे.

Aditya Thackeray : मराठी माणसाला मारहाण,भाजपच्याच राज्यात असं का होतं?;आदित्य ठाकरेंचा सवाल

दरम्यान, देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणा कुणा सोबत फोटो आहे.याचा विचार न करता कारवाई केली जाईल. असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले. तर बीडच्या पोलीस अधिक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img