2.7 C
New York

Parbhani : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची परभणी प्रकरणावर मोठी कारवाई

Published:

नागपूर : परभणी शहरातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी घडला होता. या घटनेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला काही समाज कंटकांमुळे हिंसक वळण लागले. परभणी शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती.

Aditya Thackeray : मराठी माणसाला मारहाण,भाजपच्याच राज्यात असं का होतं?;आदित्य ठाकरेंचा सवाल

परभणीतील घटनेबाबत बोलतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि मला बाळासाहेबांनी सांगितले, मला माहिती मिळाली आहे की, कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. मी तात्काळ पोलिसांशी बोललो. त्यांना विचारले कसले ऑपरेशन सुरू आहे, तर पोलीस म्हणाले व्हिडिओमध्ये दिसत असलेल्यांना आम्ही पकडतोय, मी त्यांना सांगितले त्याचा संदेश चांगला जात नाही. त्यानंतर आयजी, माझे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे एकत्रित बोलणे झाले, आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेले नाही. सहा वाजल्यानंतर कोणाला अटकही केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले हे सांगणे योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही, असे फडणवीस म्हणाले.

काँबिंग ऑपरेशनच्या बाबतीत एक तक्रार आलेली आहे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड (PI Ashok Gharband) यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला, निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरबांड यांना निलंबित केले जाईल. त्यांना निलंबित करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल त्यांनी वाजवी पेक्षा अधिक बळाचा वापर केला आहे का, याची चौकशी होईल असेही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आहेत.

Badlapur Case Upade : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट

परभणीत मंगळवार दि.10 डिसेंबर रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली व त्याची विटंबना करण्यात आली. या विटंबनेच्या विरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी लगेचच बुधवारी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान जिल्ह्यात काही समाज कंटकांकडून जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपासूनच परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन सुरु केले, गुन्हे दाखल केले आणि काहींना अटक केली गेली.

या अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला. सुरुवातीस सोमनाथचा मृत्यु हा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे पोलिंसाकडून सांगण्यात आले. परंतु नंतर झालेल्या पोस्टमॉर्टममध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचे समोर आले व तसा आरोपही करण्यात आला असल्याने सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती. त्याच मागणीसंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशोक घोरसांड यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img