12.8 C
New York

Forest Department : वनविभागात खोदकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले पोकलेन जप्त

Published:

रमेश तांबे
ओतूर : जुन्नर तालुक्यातील मौजे वडगाव कांदळी राखीव वनकक्ष क्र.४४ मध्ये अवैध रित्या विहीर खोदण्याच्या गुन्हे प्रकरणी आरोपी राजाराम ज्ञानदेव फापाळे यास जुन्नर न्यायालयाने दि १७ रोजी तीन दिवसांची वन कोठडी सुनाविन्यात आली होती. त्यानंतर दि.२० रोजी पुन्हा आरोपीस न्यायालयात हजर केले असता, आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली असून दि.३ जानेवारी २०२५ पर्यंत त्याचं जामीन राखून ठेवला असल्याची माहिती असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळे यांनी दिली.

विहीर खोदकामासाठी वापरण्यात आलेले पोकलेन मशीन वनविभागाकडुन जप्त करण्यात आले असून या गुन्ह्यातील आठ आरोपींची नावे तपासात निष्पन्न झाली असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Avinash Jadhav : “मराठी माणसांवरील अन्याय मनसे सहन करणार नाही…”,कल्याणच्या घटनेवर मनसे आक्रमक

वडगाव कांदळी राखीव वनकक्ष क्र.४४ मध्ये अवैध रित्या विहीर खोदण्याच्या गुन्ह्या प्रकरणी या गुन्ह्यात सहभागी असणारे विनोद बर्डे व त्याचे सहकारी गणेश रामदास माळी, जयवंत हिरामण बर्डे, नाथा तुकाराम बोऱ्हाडे, कैलास मधुकर बर्डे, मंजय निवृत्ती निकम,शरद हिरामण बर्डे, किसन हिरामण बर्डे हे आठ जण तसेच अन्य इसम यांच्यावर ही वनविभागाकडुन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची श्री ठोकळे यांनी सांगितले. 

मौजे वडगाव कांदळी, येडगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, निमगाव-सावा, बोरी बु इत्यादी गावांमधील लोकांना आव्हान करण्यात येते की राखीव वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे अवैध रित्या खोदकाम करणे, वन्यप्राणी शिकार करणे, अवैध वृक्षतोड अथवा अशा कोणत्याही कृत्यास, कोणत्याही प्रकारे सहकार्य केल्यास वनविभागाकडुन सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही श्री ठोकळ यांनी सांगीतले.

Dhananjay Munde : ‘धनंजय मुंडे हे कुठे लपून बसलेत?’भाजप आ.सुरेश धस यांचा सवाल

सदर कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक  स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे,ओतूरचे वनपरिक्षेत्र लहु ठोकळ,परिविक्षांधीन वनपरिक्षेत्र अधिकारी निकीता बोटकर यांनी केली असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img