बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख(Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन गाजत आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांचा संबंध असल्याचे म्हटलं जात आहे. यातील आरोपी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या टीकेची झोड उडत आहे.तसंच कराड याच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चांगलेच अडचणीत आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) फिरकलेच नाहीत.धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या गैरहजेरीने सर्वपक्षीयांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. दरम्यान याप्रकरणावर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत घणाघाती टीका केली आहे.’हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत.धनंजय मुंडेंच्या शागिर्दावर (वाल्मिक कराड) एवढे सगळे आरोप होत असताना धनंजय मुंडे हे कुठे लपून बसले आहेत ते माहीत नाही.मुंडे यांनी समाजासमोर यायला हवं. त्यांच्यावर तोंड न दाखवण्याची वेळ आली असली तरी त्यांनी समाजासमोर यायला हवं.’अशा शब्दात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.