-2.4 C
New York

Avinash Jadhav : “मराठी माणसांवरील अन्याय मनसे सहन करणार नाही…”,कल्याणच्या घटनेवर मनसे आक्रमक

Published:

ठाणे जिल्ह्याच्या कल्याणमध्ये काल एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेतदेखील बोलले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता मनसेच्या अविनाश जाधव यांनीही इशारा दिला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणावरुन कल्याणचे खासदार व शिवसेनाचे नेते श्रीकांत शिंदे यांना फटकारले आहे. अविनाश जाधव म्हणाले की, मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. कल्याणमधील ही घटना दुर्देवी आहे, मुळात ही घटना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. या घटनेवर त्यांनी अजूनही शब्द काढलेला नाही, असे म्हणत अविनाश जाधव यांनी शिंदेंवर साधला आहे.

Raj Thackeray : ‘मराठी माणसा आता तरी जागा हो’; कल्याण घटनेवर ठाकरेंची’राज’गर्जना

कल्याण प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. अविनाश जाधव म्हणाले, काल कल्याणला झाले. याआधी नालासोपारामध्ये अशी घटना घडली होती. या सगळ्या लोकांना निवडणुकीनंतर माज आला आहे. यांचा माज आता उतरण्याची गरज आहे. जरी मराठी माणूस मनसेसोबत राहिला नसेल तरी मराठी माणसासोबत मनसे नेहमी आहे. यापुढे अशी कोणतीही घटना घडली तर मनसे उत्तर देईल, असेही अविनाश जाधवांनी माध्यमांसमोर सांगितले.

“कालच्या घटनेनंतर मनसे सैनिक तयारी होते. सरकारने या घटनेत हस्तक्षेप केला पाहिजे. नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढल्या आहेत. या घटना थांबल्या नाहीत तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावे लागेल”, असेही जाधव म्हणाले. “असे हल्ले होत असतील तर आम्ही कायदा हातात घेतला तर आमचे काय चुकले?” असा प्रश्नही जाधव यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला.

Devendra Fadnavis : कल्याण प्रकरणाच्या दोषींवर मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई

“तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल तर राज साहेबांनी या सगळ्यांवर झाडू मारला तर काय चुकते. त्यावेळी आपल्याकडील नेते बोलतात. आता हे नेते कुठे आहेत. ते काहीच बोलत नाही, त्यांची ही व्होट बँक आहे. आम्ही कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करु नका”, असा इशाराही मनसे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img