2.7 C
New York

Aditya Thackeray : मराठी माणसाला मारहाण,भाजपच्याच राज्यात असं का होतं?;आदित्य ठाकरेंचा सवाल

Published:

मुंबई शहर म्हणजे स्वप्नांची नगरी. या मुंबईत प्रत्येक राज्यातील, प्रत्येक भाषिक लोक रोजगार मिळवण्यासाठी येत असतात. इतर भाषिक लोक हे मुंबईत स्थायिक होण्यासाठी येत असतात मात्र मुंबईत जवळचा असणारा मराठी माणूस सुरक्षित नसल्याचं वारंवार दिसत आहे. मुलुंड, मलबार हिल मधील परप्रांतियांनी मराठी माणसाला तुच्छ वागणूक देतानाचे व्हिडिओ चर्चेत असताना आता पुन्हा एकदा कल्याण परिसरातील एका हायक्लास सोसायटी मध्ये एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला. 

या प्रकरणाचे पडसाद राज्य विधीमंडळात उमटताना दिसत आहेत. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray ) यांनी याबाबत भाष्य करत, ‘कल्याणमधील मराठी माणसाला झालेली मारहाण संतापजनक’ असं विधान त्यांनी केलंय. नागपूरात राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, ‘मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आज घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या सोसायट्यांची ओसीच रद्द करण्याचा कायदा आणा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Badlapur Case Upade : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट

पुढे ते म्हणाले, अनेक भाषिक, अनेक धर्मीय लोक मुंबईत राहतात. महाराष्ट्रात राहतात. सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. यापूर्वी मराठी-अमराठी हे वाद कधी नव्हते. व्हेज-नॉनव्हेज हे कुठून आलं? यापूर्वी असं नव्हतं. आम्ही हिंदूधर्मीय आहोत. आम्ही मटणमच्छी खातो. इतके दिवस हा प्रकार नव्हता. आता हा प्रकार कुठून आला? आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला. राज्यात कोणी व्हेज सोसायटी करत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे? मराठी माणसाला घर दिलं नाही तर ओसी अशा सोसायटीला ओसी देऊ नका. अशा हौसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दादागिरी केली तर त्याला पोलिसांनी दांडका दाखवला पाहिजे’.मराठी नावं बदलू नका. असं करणाऱ्या बिल्डरला तुरुंगात टाका. ही टेस्ट केस असते. भाजपच्याच राज्यात असं का होतं? याचं उत्तर मिळायला हवं’ असं ही आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img