टीम इंडियाचा उत्कृष्ट फलंदाज, माजी कर्णधार आणि ऑल राऊंडर विराट कोहली भारत सोडणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली हा आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनला कायमचा स्थायिक होणार आहे, अशी माहिती विराट कोहलीचे लहानपणीचे क्रिकेट कोच राजकुमार शर्मा यांनी दिली आहे. राजकुमार शर्मा यांनी दिलेल्या या माहितीनंतर विराट कोहलीच्या फॅन्ससहित देशभरातील क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
विराट कोहलीने लहाणपणी ज्या प्रशिक्षकांकडून क्रिकेटचे धडे गिरवले, त्या राजकुमार शर्मा यांनी दैनिक जागरणला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत दरम्यान राजकुमार शर्मा यांना विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पुढील दोन कसोटी सामन्यात भारतासाठी तो आणखी दोन शतके झळकावणार आहे, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
D Gukesh : बुद्धिबळ चॅम्पियन डी.गुकेशचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत
विराट हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने शतक झळकावले. मला विश्वास आहे की आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये तो आणखी दोन शतके झळकावणार आहे. त्याने नेहमीच आपल्या क्रिकेटचा आनंद लुटला आहे. त्याचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. कठीण परिस्थितीत कशी कामगिरी करायची आणि आपल्या संघाला सामना जिंकण्यासाठी कशी मदत करायची हे त्याला माहीत आहे, असेही राजकुमार शर्मा यांनी दैनिक जागरणशी बोलताना सांगितले आहे.
याशिवाय विराट अजूनही तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्याचे त्याचे वय अजून तरी झालेले नाही. मला वाटते की तो पुढील पाच वर्षे खेळेल. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात तो भारताकडून नक्कीच खेळेल. मी त्याला गेल्या 26 वर्षांपासून ओळखतो आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की त्याच्यामध्ये अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे असे शर्मा पुढे म्हणाले आहेत.
विराट कोहली लवकरच अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा तसेच वामिका आणि अकाय यादोन मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याची योजना आखत आहे. त्यामुळे लवकरच तो भारत सोडून तिथे कायमचा स्थायिक होणार आहे, अशी मोठी माहिती राजकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे आर. अश्विनच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणेनंतर विराटबद्दल मिळालेली ही माहिती क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.