सध्या उपराजधानी नागपूर येथे राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अनेक दिवसांपासून विधानपरिषदेच्या सभापतीपदाची चर्चा सुरु होती. विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोण बसणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद मिळावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधानपरिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला.आज भाजपचे कर्जत जामखेडचे भाजपचे राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राम शिंदे यांची निवड होताच सर्वपक्षीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर विधानपरिषदेचं सभापती पद देत मोठी जवाबदारी दिली आहे.
Business News : डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला!
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून एकमताने भाजपचे राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचे जाहीर केले. राम शिंदेंच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. मला विश्वास आहे की, आपण अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने कार्यभार चालवाल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित त्यांच्या कुटुंबातील नवव्या पिढीतील व्यक्ती सभागृहात खुर्चीवर बसत आहे.असं म्हणत आपलं मत व्यक्त केलं तर ‘आपण दोघे शिंदे आहोत, त्यामुळे काही अडचण नाही. रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत. सर्वांचे लाडके भाऊ ते आहेत. नावात राम आणि आडनावात शिंदे आहेत. त्यामुळे सर्वांच ऐकून घेतील. आणि काम पण करतील’ अशा मिश्किल शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.