(शंकर जाधव)
Dombivali : वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात लहान लहान पुस्तक पेढया निर्माण करण्याचा ध्यास होता. या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी पुस्तके देणगी स्वरुपात देण्याविषयी आम्ही केलेल्या आवाहनाला सकारात्मक व मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयात देणगी स्वरुपातील पुस्तकांना खऱ्या अर्थाने मोठे यश मिळाले ते पुंडलिक अनंत पै, संचालक पै फ्रेंडस् लायब्ररी डोंबिवली यांचे 7500 पुस्तकांच्या देणगीमुळेच मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 18 पोलीस ठाणे व मुख्यालय येथे पुस्तकपेढया कार्यान्वीत झाल्या आहे. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यातही पोलिसांना वाचनाची आवड आहें.
या विषयी माहिती देताना डोंबिवली रेल्वे पालीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंद्रे म्हणाले, वाचन व्यक्तीगत पातळीवरून समष्टीकडे जाण्याचा प्रवास घडविते, या अर्थानेही वाचन संस्कृती प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक घटकात, त्या घटकांनी तयार होणाऱ्या संघटना यामध्ये रूजली पाहीजे. व्यवस्था ही सुव्यवस्था कशी बनेल हे त्या व्यवस्थेतील घटक कसा विचार करतात, कसे वागतात यावर अवलंबून असते व ती वैचरिक दृष्टी व आचरण हे वाचन घडवून आणते. कोणत्याही शहराची शैक्षणिक प्रगती जशी शाळा, महाविद्यालये यांच्यामुळे होते तशीच त्या शहराची सामाजिक प्रगती तेथील वाचनालयांमुळे होते. डोंबिवली शहराची वाचन संस्कृती जपणारं एकमेव ठिकाण म्हणजे पै यांची फ्रेंडस्.
Ram Shinde : ‘आपण दोघे शिंदे आहोत’; सभापतीपदी ‘राम शिंदेंची निवड होताच एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
२२ मे १९८६ या दिवशी एका वाचन वेड्या माणसानं लोकांनी पुस्तकांवर प्रेम करावं म्हणून वाचनालय उभारण्याचं व्रत हाती घेतलं. ती व्यक्ती म्हणजे पुंडलिक पै. आता ३७ वर्ष अखंडपणे हे व्रत चालू आहे. वाचनालयाच्या ४ शाखा, २५ हजारांपेक्षा जास्त वाचक वर्ग, ४ लाखांहून अधिक वेगवेगळी, विविध भाषेतली पुस्तक या सगळ्यांचा संग्रह पै लायब्ररीने सांभाळला आणि जोपासला आहे. वाचकांना घरबसल्या पुस्तक मिळण्यासाठी वेबसाईटची स्थापना करून पुस्तक तुम दारी या अंतर्गत मुंबई व पुणे येथे घरपोच सेवेची सुरुवात. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरू असणारे अभ्यासिकेची स्थापना केली. १ जानेवारी २०१५ रोजी एका दिवसात १०२१ सभासद नाव नोंदणी करून थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविण्यात आला.