1.1 C
New York

Mumbai Boat Tragedy : मुंबईतील बोट दुर्घटनेतील जखमींचा आकडा समोर

Published:

१८ डिसेंबरच्या सायंकाळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया जवळून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून यात ३ नौदल अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे तर १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे. या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.या प्रकरणानंतर आता नौदलाच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोट अपघात कसा झाला ?

मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. यानंतर नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. ही धडक इतर जबरदस्त होती की,या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांची रेस्क्यु टीम तैनात असून बचाव कार्य सुरु आहे.

Eknath Shinde : ‘आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे..’ठाकरे- फडणवीसांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया

जखमींचा आकडा किती?

मुंबईतील या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात जेएनपीटी रुग्णालयात एकूण ५७ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील ५३ प्रवाशांची प्रकृती स्थिर असून ३ जण गंभीर असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच नेव्हीच्या डॉकयार्ड रुग्णालयात २५ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील २३ जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचा मृत्यू झाला आहे.सध्या ही स्थिती आणि प्रवाशांना सुखरुप ठेवण्याचे काम अद्यापही सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img