7.2 C
New York

Eknath Shinde : ‘आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे..’ठाकरे- फडणवीसांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया

Published:

सध्या उपराजधानी नागपूर येथे राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (maharashtra legislative assembly 2024) सुरु आहे. अधिवेशादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांची भेट झाली. यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कविर्तक लावण्यास सुरुवात झाली. राजकीय भेट नसून शुभेच्छा देण्यासाठी भेट होती’असं स्पष्ट झालं. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांची देखील भेट घेतली. मात्र तरी देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा काही वेगळं चित्र पाहायला मिळणार का अशा चर्चा सुरु झाल्या. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरात विधीमंडळाचे अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले,’विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंमध्ये बदल झालेला दिसत आहे. २०१९ आणि २०२० मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करत आहेत ते बघा’ अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली.

Amit Shah : ‘आंबेडकर’ एक फॅशन; अमित शाहांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी ?

तर, ‘खूप चांगली गोष्ट आहे की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले. सगळे विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटतात. मुख्यमंत्री देखील प्रत्येकाला भेट देतात. हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे आता काय करतायत ते बघा.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंमध्ये बदल झालेला दिसतोय.’असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img