कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्मा सोबत जाहीर पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना रंगला होता. त्या सामन्यानंतर आर.अश्विनने आपल्या निवृत्तीची घोषणा केल्याने टीम इंडियासह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
आर.अश्विनने निवृत्तीची घोषणा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी क्लब-क्रिकेट खेळत राहिन. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल, मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी निर्माण केल्या आहेत’.असं आर.अश्विन म्हणाला.
Chhagan Bhujbal: भुजबळ पक्षांतर करणार ? लवकरच भुमिका करणार स्पष्ट
पुढे तो म्हणाला,’साहजिकच, खूप जणांचे आभार मानायचे आहेत. पण, जर मी बीसीसीआय आणि बाकीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले नाहीत तर मी माझ्या कर्तव्यात कमी पडेन. रोहित, विराट, अजिंक्य आणि पुजारा ज्यांनी हे सर्व झेल स्लिपमध्ये घेतले आणि मला त्या विकेट मिळवण्यास मदत केली. मी आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. हा खूपच भावुक करणारा प्रसंग आहे.’ असंही तो म्हणाला.