6.8 C
New York

Chhagan Bhujbal: भुजबळ पक्षांतर करणार ? लवकरच भुमिका करणार स्पष्ट

Published:

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडला. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ३९ जणांची वर्णी लागली. भाजपचे २०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १२ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १० मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. मात्र नव्या चेहऱ्यांमुळे जुन्या मंत्र्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात डिच्चू दिल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादीच्या वाट्याला १० मंत्रिपद मिळाले. त्यात अपेक्षित असलेल्यांची संधी मात्र हुकली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित असताना शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट करत दुसऱ्या नेत्याला संधी दिली. आपल्याला संधी न मिळाल्याने पक्षात असल्याची नाराजी छगन भुजबळांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. पक्षात नाराजी असूनही पक्षश्रेष्ठी लक्ष देत नसल्याचं सांगत ‘जहॉं नही चैना, वहाॅं नहीं रहना’ असं म्हणत मोठा संभ्रम निर्माण केला.

Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, कधी मिळणार 2100/- रुपये?

निर्णय घेणार असं सांगत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्यात. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, माझा शून्य सहभाग असतो असं छगन भुजबळ म्हणालेत.भुजबळांच्या नाराजी नंतर पक्षात फुट पडणार का? छगन भुजबळ हे पक्षांतर करणार का ? अशा देखील चर्चा सध्या सुरु आहेत. दरम्यान, या चर्चांवर आज नाशिक येथे समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडणार असून पुढची भुमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे.छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नेमकी कोणती भुमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img