5.6 C
New York

Amit Shah : ‘आंबेडकर’ एक फॅशन; अमित शाहांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी ?

Published:

भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या खासदारांनी दिलेल्या संविधानविरोधी चर्चेला उत्तर देण्यासाठी अमित शाहांनी भाषणाच्या सुरुवातीला डॉ.आंबेडकरांचा उल्लेख केला, त्यालाच घेऊन विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. आज हाच विरोध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी हातात आंबेडकरांचा फोटो घेऊन लोकसभेच्या बाहेर आंदोलन केले. त्याचे पडसाद राज्यातही उमटले व महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शाहांच्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. परंतु अमित शाह नेमके काय म्हणाले होते आणि यावर सत्ताधाऱ्यांचे काय म्हणणे आहे हे अनेकांना ठाऊक नाही.

मंगळवारी लोकसभेमध्ये ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मांडण्यात आले. यावर विरोधकांनी सदर विधेयक हे संविधानविरोधात आहे असा आक्षेप घेत विरोध दर्शविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याविरोधात हे विधेयक असून संघराज्य पद्धतीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणार असल्याचे विरोधकांनी संसदेत आवाज उठविला. याच विरोधाला पुढे नेत अनेक खासदारांनी आपली भूमिका सदनासमोर मांडली. त्यानंतर या सर्व विरोधाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आपल्या भाषणाची सुरवात करताना त्यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले. मात्र त्यांची नाव घेण्याची ही शैली आता टीकेची धनी ठरली आहे.

अमित शाह म्हणाले कि, आता एक फॅशन झाली आहे. आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग लाभला असता,” असे म्हणत अमित शाहांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला. याच मुद्द्यावरुन आता विरोधकांनी अमित शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. ज्या पद्धतीने अमित शाहांनी अनेकदा डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले ते अपमानास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अमित शाहांच्या या विधानाचा व्हिडीओ विरोधकांकडून समाज माध्यमांवर व्हायरल केला जात आहे.

R.Ashwin Retirement : आर.अश्विनची क्रिकेटमधून निवृत्ती,टीम इंडियाला धक्का

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करत अमित शाहांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे कि, “बाबासाहेबांचा असा अपमान केवळ आणि केवळ तीच व्यक्ती करु शकते जिच्या मनात बाबासाहेबांच्या संविधनाबद्दल द्वेष आहे. ज्यांच्या पुर्वजांनी शोषित आणि वंचितांसाठी दूत असलेल्या बाबासाहेबांचे पुतळे जाळले तेच असं बोलू शकतात. या संघाच्या लोकांना बाबाबासाहेबांच्या नावाचा एवढा त्रास का होतो? त्यांना या नावाबद्दल इतकी घ्रृणा का आहे?” असा सवालही श्रीनेत यांनी उपस्थित केला आहे.

एका बाजुने विरोधकांकडून अशी टीका होत असताना सत्ताधारी भाजप समर्थकांकडून अमित शाहांनी काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अपमान वेळोवेळी कसा केलाय हे पटवून देण्यासंदर्भात काही ऐतिहासिक संदर्भ देण्याआधी हे विधान केल्याचे म्हटले आहे. अमित शहांनी डॉ.आंबेडकरांचा अपमान केलेला नाही हे सिद्ध करण्यासाठी भाजपच्या समर्थकांकडून अमित शाहांच्या याच भाषणातील व्हिडीओचा पुढील भाग व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये अमित शाहांनी कशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मुद्द्यांवर कोणतीही दखल न घेण्यात आल्याने पहिल्या नेहरु सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला याबद्दलची माहिती संदर्भातसहीत वाचून दाखवल्याचं दिसत आहे. परंतु केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.आंबेडकरांच्या राजीनाम्याची जी कारणे वाचुन दाखवली ती किती खरी आहेत यावरुन नव्या वादाचा जन्म होऊ शकतो अशी वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img