१५ डिसेंबरला राज्याच्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion)पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या सरकारमध्ये स्थान मिळालं. मात्र यात महायुतीच्या अनेक नेत्यांना संधी दिली नाही. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांचा समावेश आहे. त्यामुळे रविवारपासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पक्षात असलेली नाराजी उघडपणे स्प्ष्ट केली.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री मंडळात स्थान मिळालं नाही. पक्षात नाराजी आहे का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देत म्हणाले, होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ कधी संपले नाही? असे वक्तव्य करत आपली ताकद दाखवण्याचे संकेत दिले.ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं.’असं वक्तव्य भुजबळांनी केलं.
Zakir Hussain : उस्ताद जाकीर हुसैन यांचा कारकिर्द कशी होती ?
पुढे ते म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी काही संवाद झाला का? त्यावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून अजित पवार यांच्याशी बोललो नाही. मला ते गरजेचे वाटले नाही. मी पुढे काय करायचे त्याचा निर्णय अजून घेतला नाही. त्यासंदर्भात मी माझ्या लोकांशी बोलणार आहे. समता परिषदेच्या लोकांशी बोलणार नाही. त्यानंतर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीतील बडे नेते नाराज असल्याचं चिन्ह सध्या दिसत आहे.