10.9 C
New York

Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, कधी मिळणार 2100/- रुपये?

Published:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर केल्यात. यातील 1400 कोटी रुपयांची तरतूद ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 ऐवजी दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिले होते. राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेसाठी एकूण 46 हजार कोटी वर्षाकाठी लागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, योजना जुलै 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36 हजार कोटी लागणार होते. तशी तरतुद राज्य सरकारने केली आहे. पैकी 17 हजार कोटी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 19 हजार कोटी शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.

D Gukesh : बुद्धिबळ चॅम्पियन डी.गुकेशचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत

आताच्या पुरवणी मागणीत 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पुर्ततेसाठी करण्यात आली असल्याचे समजले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट लागणार आहे. यानुसार डिसेंबर ते मार्चपर्यंत 14 हजार कोटी रुपये लागणार आहेत. आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20 हजार 400 कोटी शिल्लक आहेत. प्रशासकिय पुर्तता करण्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणींसाठी केलेल्या 2100 रुपयांच्या घोषणे संदर्भात काहीच निर्णय अद्याप झाला नसल्याच यावरुन स्पष्ट होत आहे.

Chhagan Bhujbal : ‘होय मी नाराज’,छगन भुजबळांनी उघड केली नाराजी

लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100/- रुपये?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना राज्य सरकारने जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पाच हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये दिले गेले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ असे आश्नासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार करु असे म्हटले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल का असा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनात घर करत आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img