एक काळ असा होता की, झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची. प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत. त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभरात चाहते आहेत. एक काळ असा होता की, झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची. प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत. त्यांच्या तबला वादनाच्या कौशल्याने त्यांचे जगभरात चाहते आहेत. पण १५ तारखेच्या रात्री उस्ताद झाकीर उस्ताद यांचं वयाच्या७३ व्या वर्षी दु:खद निधन झाले अशी बातमी माध्यमांवर आली आणि संपूर्ण कला क्षेत्रात शोककळा पसरली. झाकीर हुसेन यांची कारकीर्द कशी होती हे पाहुयात.
९ मार्च १९५१ साली उस्ताद अल्ला राखा यांच्या घरी पुत्र रत्न प्राप्त झाले आणि त्याचे नाव ‘हुसेन’ मूळचे जम्मू आणि काश्मीरमधील जम्मूचे होते. झाकीर हुसैन यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त करण्यापूर्वी मुंबईतील सेंट मायकल हायस्कूलमध्ये आपले प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. त्याचा अभ्यास करत असताना, त्याने एकाच वेळी तबल्यावरील आपल्या कौशल्याचा गौरव केला, आणि त्वरीत एक प्रतिभावान म्हणून ओळख मिळवली. लहानपणापासूनच संगीतात बुडलेल्या झाकीर हुसैन यांना केवळ त्यांच्या वडिलांची प्रतिभाच नाही तर तबल्याच्या गुंतागुंतीच्या तालांना जगासोबत सामायिक करण्याचे त्यांचे ध्येय देखील आहे. ते स्वत: एक दिग्गज तबलावादक होते ज्यांनी सितार वादक रविशंकर यांच्यासमवेत अनेक प्रतिष्ठित कामगिरी केली होती.
Uddhav Thackeray And Raj Thackeray :ठाकरे बंधु येणार एकत्र ? रश्मी ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचं स्वागत
उस्ताद झाकीर हुसेन यांना पहिल्यांदा २००९ मध्ये पहिल्यांदा संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळी त्यांना ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. हुसैन यांनी यासाठी मिकी हार्ट आणि जिओव्हानी हिडाल्गो यांच्यासोबत एकत्र काम केलं होतं. भारतातील सर्वात ख्यातनाम शास्त्रीय संगीतकारांपैकी एक असलेल्या तालवादकाला 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. 2024 मध्ये झालेल्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते. बेस्ट कंटेम्पररी इंस्ट्रुमेंटल अल्बम कॅटेगरीत ‘ॲज वी स्पीक’साठी, बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीत ‘दिस मोमेंट’ आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीत ‘पश्तो’साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.