जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या डी.गुकेश(D Gukesh) बुद्धिबळ चॅम्पियन डी.गुकेशचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत यश मिळवलं. १८व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला.विजेतेपद जिंकल्यानंतर डी.गुकेश हा चेन्नईला परतला. आज चेन्नई विमानतळावर डी.गुकेश याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
अनेक चाहते विमानतळावर दाखल झाले असून शुभेच्छांचा वर्षाव हा करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले. डी गुकेशने गुरुवारी त्यांच्या अंतिम लढतीत लिरेनवर विजय मिळवून FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू बनून इतिहास रचला. बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्यानंतर डी.गुकेश याचा समावेश आहे.
Chhagan Bhujbal : ‘होय मी नाराज’,छगन भुजबळांनी उघड केली नाराजी
सिंगापूरमध्ये झालेल्या या लढतीत १४व्या डावामध्ये डिंग लिरेनकडे पांढरी मोहरी असूनही, गुकेश अधिक आक्रमकपणे आणि आत्मविश्वासाने खेळत होता. लढतीपूर्वी आणि दरम्यान डिंग लिरेन जगज्जेता होता. तुलनेने नवखा असूनही गुकेशनेच बहुतेकदा विजयासाठी प्रयत्न केले. या लढतीतील पहिला डाव गमावूनही गुकेश विचलित झाला नाही.