राजकारणात असे अनेक नेते मंडळी आहेत ज्यांच्या एकत्र येण्याची अवघा महाराष्ट्र वाट पाहत आहे. अशातच एक म्हणजे ठाकरे बंधू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं यासाठी महाराष्ट्र पर्यंत करत आहे..लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान राज्याच्या राजकारणात वेगळ चित्र पाहायला मिळेल अस वाटत असताना मात्र त्यावेळी देखील एकमेकांवर टीका करताना दिसून आले. मात्र आज काहीस वेगळा चित्र पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाचा लग्न सोहळा हॉटेल ताज येथे पार पडला.या सोहळ्यात राज ठाकरेंनी हजेरी लावल्याच पाहायला मिळालं. रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत ही केलं.श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. या कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही.
Parbhani Riots : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे हे एकमेकांना जोरदार टीका करताना बघायला मिळाले. मात्र कौटुंबिक सोहळ्याला ठाकरे बंधूंची उपस्थिती बघायला मिळाली. विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघात यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात होते. पण या कौटुंबिक सोहळ्यात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राजकारणात एकमेकांवर टीका करणारे इतक्या वर्षांनी कौटुंबिक कार्यक्रमात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.