परभणी जिल्ह्यात (Parbhani Dist.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर स्थानीकांकडून बंद पुकारण्यात आला होता. नंतर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद या तीन ते चार दिवस चाललेल्या घटनांनंतर 50 जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते.
या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) असे या 35 वर्षीय मृत तरुणाचे नाव असून कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या या तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या ‘या’ चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार?
घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याची कारणे काय आहेत याबाबत सध्यातरी काहीही स्पष्टता आलेली नाही. या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.