0.5 C
New York

Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या ‘या’ चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार?

Published:

लोकसभा निवजणूकीत (Lok Sabha Election 2024) मिळालेल्या मोठ्या अपयशानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसून आल्याचं म्हंटलं गेलं. आता राज्यातील लाडक्या बहिणींसोबतच पक्षातील लाडक्या बहिणींनादेखील महायुती स्थान देणार असल्याचं बोललं जातय. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत सहभागी असलेल्या प्रमुख तीन पक्षांच्या मिळून 20 महिला आमदार विजयी झाल्या आहेत. यात भाजपच्या 14, शिंदेसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदारांचा समावेश आहे. सध्या ज्या आमदारांची नावे मंत्रीपदासाठी ठरली गेल्याचं मानलं जात आहेत त्यात भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde), मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) आणि माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांची नावे आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाचा समावेश मंत्रीमंडळामध्ये (Maharashtra Cabinet expansion) करण्यात आला आहे.

महायुतीने राज्यात लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली, त्याचा लाभ सर्वसामान्य महिलांना मोठ्या प्रमाणावर झाला. आता विधानसभेमध्ये निवडून आलेल्या महिला आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आणि त्यांनाही मोठा लाभ मिळणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुतीतील जवळपास चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. त्यांच्याच विभागाकडून राज्यात लाडकी बहिण योजना आणण्यात आली होती. याआधी देखील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महिला व बालविकास खात राहिलं आहे. तर भाजपकडून पंकजा मुंडे (Pankja Munde), मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) आणि माधुरी मिसाळ (Madhuri Misal )यांची नावे आहेत.

Aditya Thackeray : मंत्रिमंडळातून ‘या’ नेत्यांना बाजुला ठेवण्याची देवेंद्र फडणवीसांना मागणी

मंत्रिमंडळातील महिलांची संख्या वाढवण्यासाठी महायुती सरकार भर देत असल्याचं दिसुन येत आहे. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती. त्यानंतर यावेळी मात्र चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जिंकून आलेल्या ज्या महिला आमदार आहेत, त्यांची संख्या वीस आहे. ज्या 4 महिलांना मंत्रिपद देण्यात येणार आहेत, त्यांचे प्रोफाइल आधीच दिल्ली दरबारी पाठवण्यात आल्याची माहिती होती. त्यांच्या नावावर चर्चा झाली आहे. त्यानंतर आज या महिला आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेतील असे समजले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img