मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार स्थापन झाले आणि आज नव्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आज नागपुरात होणार आहे. आज दुपारी ४ वाजता हा शपथविधी समारोह पार पडेल.यंदाच्या मंत्री मंडळात संधी मिळावी यासाठी अनेक नेते शर्तीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नव्या चेहऱ्यांना आता संधी देण्याचं ठरवलंय.
महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरवलं आहे. यात भाजपचे ९, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ६ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ नवे चेहरे यंदाच्या मंत्री मंडळात असणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भाजप पक्षाचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane), माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे(Jaykumar Gore) , शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale), मेघना बोर्डीकर(Meghana Bordikar), पंकज भोयर (Pankaj Bhoyar), आकाश फुंडकर (Akash phundkar), अशोक उईके(Ashok Uike ), संजय सावकारे (Sanjay Savkare ) यांना मंत्री मंडळात पहिल्यांदा संधी मिळणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik ), भारत गोगावले (Bharat gogavale), योगेश कदम (yogesh kadam ), प्रकाश आबिटकर(Prakash Abitkar), संजय शिरसाट (Sanjay shirsat), आशिष जयस्वाल (Ashish jaiswal)यांचा समावेश आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ(Narhari jhirwal), मकरंद जाधव पाटील (Makrand patil ), बाबासाहेब पाटील (babasaheb patil), इंद्रनील नाईक (Indranil naik) या नेत्यांचा समावेश आहे.
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीच्या ‘या’ चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार?
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या पक्षक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं निश्चित केलं आहे. तरी देखील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ मिळणार नसल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नाट्य दिसत आहे. त्यामुळे नाराज झालेल्यांची आमदारांची नाराजी पक्षश्रेष्ठी दुर करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.