राज्यात सध्या सर्वत्र थंडीचा कडाका लागत आहे. बहुतांश भागात थंडीचा गारठा पडत आहे. महाराष्ट्रात नाशिक, विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांत थंडीचा जोर वाढला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे.राज्यातही गारठा कायम असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात निचांकी ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे.पुण्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र थंडी कायम राहणार आहे.राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Assembly Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनात गाजणार ‘हे’ मुद्दे
राज्यातही गारठा कायम असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात निचांकी ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिकमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. यामुळे नाशिकच्या निफाडमधील किमान तापमानाचा पारा घसरला आहे.गेल्या आठवडाभरापासून धुळ्यात आठ अंश सेल्सिअसपेक्षा देखील कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.धुळ्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी असल्याचे दिसत आहे.वाढलेली थंडी हरभरा आणि गहू या पिकांना फायदेशीर ठरणार असून शेतकऱ्यांकडून आता सरकारकडून दिवसा बारा तास वीज पुरवठा देण्याची मागणी होऊ लागली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा तडाका वाढताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील वातावरण हे ढगाळ तर बहुतांशी सूर्यप्रकाशित राहणार असून किमान तापमान हे 12 अंश सेल्सीअसवर आहे. त्यामुळे वातावरण हे थोडं बदलेल पाहिला मिळेल.उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात गारठा आहे.