एका बाजुला देशात ‘लव्ह जिहाद’वर वाद सुरु असताना दुसऱ्या बाजुला बॉम्बे हाईकोर्टाच्या मुंबई खंडपीठाने (Bombay High Court) मात्र ह्या विषयावर एक वेगळा निर्णय दिला आहे. ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad)ह्या मुद्यावर देशाच्या संसदेतदेखील काही खासदार बोलताना दिसतात. त्यात हिंदु तरुणींचा मुस्लिम तरुणांकडून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा गैरवापर करणे अशा प्रकारच्या चर्चा रंगताना दिसतात. याच विषयावर ‘द केरला स्टोरी’ या नावाने एक हिंदी चित्रपटदेखील आला होता. उत्तर प्रदेश सरकारने तर ‘लव्ह जिहाद’ सारख्या गोष्टींवर नियंत्रण करण्यासाठी ‘अँटी-रोमियो स्कॉड’ची निर्मीती केली होती. अशातच मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने हिंदू महिला व मुस्लिम पुरुष या दोघांनाही शुक्रवारी दिलासा दिला. आयुष्य हे तिचे असून तिला तिच्या इच्छेनुसार जगण्याचा, निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम पुरुषासोबत हिंदू महिलेला राहण्याची परवानगी दिली आहे. मुस्लिम पुरुषासोबत हिंदू मुलीचे प्रेमसंबंध असल्याने पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपल्याला चेंबूर येथील शेल्टर होममध्ये बेकायदेशीररीत्या डाबून ठेवल्याची तक्रार करत त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला अनेकांकडून धमक्या येत असून सुरक्षेसाठी पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्याने हाईकोर्टात केली, या याचिकेवर न्यायमुर्ती भारती डांगरे (Justice Bharati Dangre) आणि न्यायमुर्ती मंजूषा देशपांडे(Justice Manjusha Deshpande) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
Maharashtra Cabinet Expansion:राज्यमंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार,संभाव्य यादी समोर
यात खंडपीठाने आम्ही या तरुणीला स्वातंत्र्य देत आहोत, तिला पाहिजे ते करू द्या, हे तिचे जीवन आहे, असे तिचे मत आहे, आम्ही फक्त तिला शुभेच्छा देऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवले. मुलीच्या पालकांच्या बाजुने वकिलांनी असा युक्तिवाद केला, की ‘ती भावनिकरीत्या प्रभावित झाली आहे आणि प्रभावाखाली निर्णय घेत आहे.’ त्यावर न्यायालय म्हणाले की, ‘आम्ही तिला पालकांकडे जाण्यास सांगितले होते; मात्र ती तयार नाही. आम्ही तिला आणखी एक वर्ष तिच्या आई-वडिलांसोबत राहण्याचा सल्ला दिला होता; मात्र तिला तिच्या कल्याणाची जाणीव असेल तर काही हरकत नाही,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.