Mumbai : केंद्र सरकारने ‘वन नेशन वन इलेक्शन'(One Nation, One election) या विधेयकाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे(Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.आज माध्यमांशी त्यांनी संवाद साधला असता ते म्हणाले,’२०२९ पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उदध्वस्त करण्याच्या योजना नरेंद्र मोदी यांच्या आहेत. त्यातील एक म्हणजे, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही त्यांची संकल्पना आहे. वन नेशन वन इलेक्शन करणारे बीएमसी निवडणूक घेऊ शकले नाहीत अशी देखील टीका त्यांनी केली.
http://One Nation, One Election : केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केले ‘एक देश, एक निवडणूकीचे’ विधेयक
दरम्यान, काल ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांचा ८५ वा वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (ajit pawar) यांनी शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावर ‘शरद पवार (Sharad pawar)आणि अजित पवार (ajit pawar) पुन्हा एकत्र येणार का?’अशा चर्चा सुरु झाल्या. यावर, ‘मी शरद पवारांना ओळखतो, शरद पवार वेगळा विचार करणार नाहीत’ असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलयं. तर तुम्हाला हारण्याची भीती वाटते म्हणून तुम्ही मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अद्याप घेऊ शकलेला नाहीत. तुम्ही महाराष्ट्रातील स्थानि स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेतल्या नाहीत. असं देखील संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.