0.5 C
New York

भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 7 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत कमी

Published:

आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै -सप्टेंबर 2024 या कालावीत भारताचा आर्थिक विकास दर 5.4 टक्क्यांवर पोहोचला. यानंतर आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. ती म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) बुधवारी चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज कमी केला आहे. खाजगी गुंतवणूक आणि घरांच्या मागणीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ यामागचे कारण असल्याचे एडीबीने म्हटले.

एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) ने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी खाजगी गुंतवणूक आणि घरांच्या मागणीत अपेक्षेपेक्षा कमी वाढीमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 7 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्याचवेळी, आरबीआयने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांवरून सात टक्क्यांवर आणला आहे.
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आशियाई विकास परिस्थिती अहवालानुसार, यूएस व्यापार, वित्तीय आणि इमिग्रेशन धोरणांमधील बदलांचा विकासशील आशिया व पॅसिफिक प्रदेशातील वाढीवर परिणाम होऊ शकतो, परिणामी महागाई वाढू शकते. याशिवाय 2024 मध्ये आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील अर्थव्यवस्था 4.9 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे, जी सप्टेंबरमध्ये एडीबीने केलेल्या पाच टक्के अंदाजापेक्षा किंचित कमी आहे.

एडीबीने सांगितले की खाजगी गुंतवणूक आणि घरांच्या मागणीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5 टक्के राहील तर, याआधी भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के दराने वाढेल असा अंदाज होता. एडीबीने पुढील आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज 7.2 टक्क्यांवरून सात टक्क्यांवर कमी केला आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेनेही अलीकडेच चालू आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाज गेल्या आठवड्यात 7.2 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर आणला होता. आर्थिक घडामोडींमधील मंदी आणि अन्नधान्याच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता मध्यवर्ती बँकेने महागाईचा अंदाज 4.8 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

दरम्यान, चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर कालावधीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 5.4 टक्के सात तिमाहीतील नीचांकी पातळीवर घसरला तर, आरबीआयने 7 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. एडीबीने म्हटले की अंदाजात कपात करूनही जागतिक पातळीवर भारताची वाढ मजबूत राहील. उन्हाळी पीक हंगामामुळे उच्च कृषी उत्पादनामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img