दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याला हैदराबादमधील चिक्कडपली पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांआधी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा-२’या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिनेता अल्लू अर्जून याला पाहण्याची चाहत्यांची तोबा गर्दी झाली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला.याप्रकरणी अल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेता अल्लू अर्जून याने आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत त्या महिलेला आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज अल्लू अर्जून याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
http://Sanjay Raut : ‘शरद पवार वेगळा विचार करणार नाहीत’; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
४ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंडाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा-२’या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. त्या प्रीमिअर ला अल्लू अर्जून आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी थिएटर मध्ये गेले असता चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी थिएटरमध्ये तुडुंब गर्दी केली. त्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षाचा मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जूनविरोधात तक्रार दाखल केली होती. अखेर आज अभिनेता अल्लू अर्जून ला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.