13.7 C
New York

Sanjay Raut : संसदेत विरोधकांना बोलू न देणे ही कोणती लोकशाही? राऊतांचा सवाल

Published:

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, संसदेच्या लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज अद्यापही सुरळीतपणे चालू शकलेले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यामुळे याच मुद्द्यावरून आता सत्ताधाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित केला आहे. गौतम अदानी यांच्या विषयावर विरोधक बोलू लागले की त्यांना शांत केले जाते किंवा विरोधक कोणत्याही विषयावर बोलू लागले की त्यांना बोलू दिले जात नाही, ही सत्ताधाऱ्यांची कोणती लोकशाही आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 11 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सभागृहात विरोधकांना बोलू देण्यात येत नसल्याचा मुद्दा प्रसार माध्यमांसमोर मांडला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेतील सभापती पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. याबाबत ते म्हणाले की, सभागृह चालू देण्याची जबाबदारी किंवा कर्तव्य हे सत्ताधारी पक्षाचे असते. पण गेल्या 10 वर्षातील सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला काही संविधानिक अधिकार आहेत, या देशामध्ये लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, निवडून आलेले आमदार-खासदार हे राज्याच्या किंवा राष्ट्राच्या हितावर आपल्या भूमिका मांडू शकतात, हे मानायला तयार नाहीत. गौतम अदानींचा विषय हा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या एका न्यायालयाने अदानींवर ठपका ठेवलेला आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, त्या विषयावर आम्ही बोलायला उभे राहिलो तर आम्ही बोलू दिले जात नाही, सभागृह तहकूब केले जाते, असा आरोप खासदार राऊतांकडून करण्यात आला आहे.

भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम

तसेच, आताही कोण कोणते जॉर्ज सोरस नावाचे 95 वर्षाचे गृहस्थ आहेत. त्यांनी भारताच्या लोकशाही, संसद अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. असा शोध भाजपाने लावला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजपा लोकसभा आणि राज्यसभा चालू देत नाहीयेत. सभागृह ही चर्चेची ठिकाण आहेत, चर्चा ही व्हायला हवी आहे. विरोधी पक्षाने उपस्थित केले मुद्दे असतील किंवा सत्ताधारी पक्षाने उपस्थित केले मुद्दे असतील, चर्चा ही व्हायलाच हवी. पण सत्ताधारी बोलूच देत नाही आणि सभागृह सुरू झाले की गोंधळ घालण्यास सुरुवात करतात, ही पहिली घटना आहे. भारताच्या इतिहासात असे याआधी कधीच घडले नव्हते. सत्ताधाऱ्यांनी संयम पाळायचा असतो तर विरोधकांनी आवाज उठवायचा असतो कारण ते त्यांचे काम आहे. आवाज चढवणे, बोलणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. हा लोकशाहीचा भाग आहे, असे यावेळी राऊतांनी म्हटले.

परंतु, विरोधी पक्षाला बोलू द्यायचे नाही, विरोधी पक्षाची अवहेलना करायची. विरोधी पक्षनेत्याचा माइक बंद करायचा. विरोधकांना बोलू द्यायचे नाही, ही कोणती लोकशाही आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर, विषय आहे की राज्यसभा सभापती यांच्याविरोधात जो अविश्वास ठराव आणला जात आहे त्याबद्दल. कारण गेले काही दिवस संविधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणाने वागताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचे काम सभागृहात संयम आणि समतोल राखण्याच आहे. पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बोलून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याचेही राऊतांकडून यावेळी सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img