-3.5 C
New York

Cabinet Expansion : शिंदे गटाच्या नेत्याचं मंत्रिमंडळावर मोठं विधान

Published:

महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आता सर्वांचं लक्ष हे लागलं आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला. (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र, अद्यापही झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यातच हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. परंतु, भाजप गृहखात शिवसेनेला देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विस्तार लांबल्याची चर्चा आहे.

शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे. एवढा वेळ मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी का लागत आहे? याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. तसंच, ‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा या विधानामुळे अद्यापही कायम असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम

Cabinet Expansion गुलाबराव पाटील काय म्हणाले?

आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात दिलेले आहेत. तसंच, जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीमात्र, तीन पक्ष असल्यामुळे वेळ लागत आहे. आता शिवसेनेला किती खाते मिळतील? हे देखील आम्हाला माहिती नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. आमच्या पक्षाला किती मंत्रि‍पदे घ्यावी? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याकडून अशी कोणतेही वक्तव्य नाही की एवढे खाते आम्हाला मिळतील? किंवा हे मंत्रिपद आम्हाला मिळेल. आमच्यामध्ये एक वाक्यता याचा अर्थ हा आहे की आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळावं, यासाठी सर्वच आमदारांनी आग्रह केला होता. तसंच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही. आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह जरी धरलेला असला तरी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे, असंही ते म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img