13.7 C
New York

Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Published:

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या (UNEP)चा ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. UNEP च्या ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ पुरस्कारानं अशा व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केलं जातं, ज्यांनी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या (Madhav Gadgil ) कामानं मोठा प्रभाव पडला आहे. २००५ पासून या पुरस्काराने आतापर्यंत १२२ संशोधकांना गौरविण्यात आलं आहे.

गाडगीळ मागील अनेक दशके संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून लोक आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम करत आहेत. डॉ. गाडगीळ यांना यापूर्वी ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे भारताचे मानाचे पुरस्कार मिळाले असून, जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलx आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत.

RBI गव्हर्नरला किती पगार मिळतो?

गाडगीळ यांनी पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला आहे. आतापर्यंत ७ पुस्तके डॉ. गाडगीळ यांनी लिहिली असून, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img