परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे (Parbhani News) प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या (Insult Of Constitution) निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून महामार्ग रोखून धरला. महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) मोठा हिंसाचार उसळला आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत आज (बुधवारी) बंद पुकारण्यात आलाय.
बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला (Parbhani News) आहे. मात्र, दरम्यान आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून परभणी नांदेड महामार्ग रोखून धरला. मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर जमाव आक्रमक ( Dr Babasaheb Ambedkar) झाल्याचं दिसतंय. पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली. काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांनी केलीय.
पोलिसांनी आक्रमक झालेल्या जमावावर ॲक्शन घेतली. या आंदोलकांवर त्यांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचं देखील समोर आलंय. तसेच शहरांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेची विटंबणा झाल्याचा प्रकार घडला होता. याच्याच निषेधार्थ आज परभणी बंद होता. या बंदला हिंसक वळण लागलं असून आंदोलन करत असलेल्या तरुणांनी गाड्यांची तोडफोड देखील केलीय.
संविधानाच्या अवमानावरून महाराष्ट्रातील परभणीमध्ये अचानक हिंसाचार उसळला आहे. यानंतर अनेक भागात जाळपोळ करण्यात आली. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. बेशिस्त लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिलीय. परभणीत जातीयवादी मराठा समाज कंटकांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्यावर भारतीय राज्यघटनेची विटंबना करणे, अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलंय. दलित अस्मितेचे प्रतिक असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच वेळ नाही, असं देखील आंबेडकरांनी म्हटलंय.