13.7 C
New York

Maharashtra Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला; दिल्लीतूनच तोडगा निघणार?

Published:

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार? हा राजकीय वर्तुळात प्रश्न आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, काल 10 डिसेंबर रोजी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक झाली. मेघदूत बंगल्यावर ही बैठक दीड तास चालली होती.

रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत मंत्रिपद आणि खात्यांच्या वाटपावर चर्चा झाली, मात्र अजून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचे (Maharashtra Politics) आज तिन्ही नेते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. बैठकीत तोडगा निघाला, तर 14 किंवा 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार शक्यता वर्तवली जातेय.

त्याचवेळी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं देखील महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसी, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि आशिष जैस्वाल यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

जगातील कोणत्या पर्वतांवर चढाईची परवानगी नाही, यामागचे कारण काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत. अमित शाह यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ही सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगितले जातंय. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होईल, अशी देखील चर्चा सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे.

फडणवीस गृहखाते स्वत:कडे ठेवतील, तर अर्थखाते पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे दिलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. शिंदे यांना नगरविकास मंत्रालय मिळणार हे निश्चित मानले जात आहे. नागपुरमध्ये 16 डिसेंबरपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, त्याअगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img