एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळी यांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यांच्या प्रकृती स्थिर असून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाख रुपयांची जाहीर मदत केली आहे.
जालन्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी करीना थापाची निवड
लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात मिळणार
मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय शिरसाट करणार बीड दौरा
बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत बीड दौरा करणार आहेत.तर, सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे.
पुन्हा एकदा भेटून निर्णय घेणार, छगन भुजबळांची माहिती
पुण्यात पुन्हा एकदा हिट अॅंड रन, डंपरच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू
अखेर खातंवाटप झालं ! अजित पवारांकडेच राहणार ‘अर्थ’ खातं
गृहखातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच, तर अर्थ खात्यावर अजित पवारांचं नाव आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम सोडून) खातं मिळाल आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार – एकनाथ शिंदे
अधिवेशन संपल्यानंतर शिंदे- फडणवीसांची संयुक्त पत्रकार परिषद
मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंचा स्वबळाचा नारा; संजय राऊतांनी दिले संकेत
आज शरद पवार करणार परभणी दौरा
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
बदलापूरच्या खासगी शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. काही महिन्यांपूर्वी पोलीस एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत.अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार द्या, असे हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
बीड हत्या प्रकरणाचे विधीमंडळात उमटले पडसाद
रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती;टीम इंडियाला धक्का
बीड-परभणीच्या मुद्द्यावरती आज सुरुवातीलाच विधानसभेत होणार चर्चा
शरद पवारांचे शिलेदार शशिकांत शिंदे अजित पवारांच्या भेटीला
आज छगन भुजबळ भुमिका स्पष्ट करणार
महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, मात्र त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी न लागल्याने पक्षात असलेली नाराजी उघडपणे व्यक्त केली.मात्र आज नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक घेऊन आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. भुजबळांच्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडून नवनिर्वाचित मंत्र्यांचा परिचय
आजापासून नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन आजपासून उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. आजपासून २१ तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु राहिल.
आमदार भरत गोगावले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले आमदार भरत गोगावले यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
आमदार माधुरी मिसाळ यांना मिळालं मंत्रिपद
आमदार नितेश राणे यांना मिळालं मंत्रिपद
आशिष जयस्वाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
आमदार माधुरी मिसाळ यांना मिळालं मंत्रिपद
आमदार आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
संजय शिरसाट यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार असून मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांची मंत्रिपदाची इच्छा आता पूर्ण झाल्याने शिवसेनेतील नाराजी दुर झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रतिक्षा संपली ! पंकजा मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मानिकराव कोकाटे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
दत्तात्रय भरणे यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांना मिळालं मंत्रिपद
भाजपचे गणेश नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
उपराजधानी नागपूर मध्ये पार पडला मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. यात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखेपाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार
आज नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून नागपूरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. उद्यापासूुन नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे कोणला कोणतं खातं मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालावली
भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ओपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
रविवारी होणार नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता येत्या १५ तारखेला नागपूरात नव्या सरकारचा मंत्रि मंडळ विस्तार होणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते ‘देवगिरी’ बंगल्यावर; वळसे पाटील, मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीला
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरु आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये राजकीय खलबत सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते देवगिरीवर दाखल झाले असून दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांचा समावेश आहे. भेटीचं कारण अद्यापही स्पष्ट नाही.
‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला केंद्र मंत्रिमंडळाची मंजूरी
केंद्र मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळात या विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांकडून शुभेच्छा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी जमा झाली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्मंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली आहे. याभेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
कुर्ला बस अपघातातील ड्रायव्हर संजय मोरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी
मुंबईतील कुर्ल्यात मृत्यूचे तांडव माजवून 7 लोकांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या बेस्ट बसचा ड्रायव्हर संजय मोरेला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळाली आहे.
विश्वास, स्थिरता आणि विकास कायम ठेवू – RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, “मी वारसा कायम ठेवेल आणि पुढे नेईन. मला वाटते की सर्व व्यवसायांना, सर्व लोकांना सातत्य आणि स्थिरता आवश्यक आहे. आम्ही विश्वास, स्थिरता आणि विकासाची थीम कायम ठेवू.”
उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; नाशिकचे किमान तापमान 9.4 अंश सेल्सियस
फेंगल वादळामुळे राज्यात थंडी कमी झाली होती पण आता पाकिस्तानकडून थंड वारे वाहत असून उत्तरेत शीत लहर आहे. यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 9.4 अंश सेल्सियस वर पोहचले आहे.
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग, जयंत पाटील यांचा दावा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा महाग वीज असल्याचा दावा केला आहे. त्यांनी थेट आकडेवारीच मांडली आहे. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट 5.16 ते 17.79 रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे.