13.7 C
New York

Crime News : फेसबुकवर मैत्री करून,फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.१० डिसेंबर ( रमेश तांबे )  

फेसबुकवर महिलेशी ओळख करून,वेळोवेळी चॅटिंग होऊन मैत्री केली,त्यानंतर (Crime News)आरोपीने पिडीत महिलेशी जवळीक साधून, एप्रिल २०२० दरम्यान पिडीत महिलेचे आरोपीने  दोघांचे एकत्र फोटो काढून,आरोपीने काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल अशी धमकी देऊन, सदर महिलेवर आरोपीने अत्याचार केल्याची घटना ओतूर ( ता.जुन्नर ) येथे घडली असून,याबाबत ३२ वर्षीय पिडीत महिलेने ओतूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

शशांक शरद जोशी वय ३८ वर्षे, व्यवसाय भटजी काम, रा.ओतूर, ता. जुन्नर, जि.पुणे असे अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.

ओतूर पोलीसांनी  भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४,७८,३३३,११५,३५१,(२) प्रमाणे ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबत ओतूर पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की,यातील फिर्यादी पिडीत महिला व आरोपी शशांक जोशी यांची सन २०२० मध्ये फेसबुक अकाउंट मार्फत ओळख झाली ओळखीने त्यांचेच वेळोवेळी चॅटिंग होऊन मैत्री झाली. त्यानंतर आरोपी हा पिडीत महिलेला सारखा फोन करू लागला व त्यांचे संभाषण चालू झाले. एप्रिल २०२० दरम्यान सदर महिलेला आरोपी ने मौजे खुबी ( ता.जुन्नर ) येथील खिरेश्वर कडे जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या धरणाच्या बंधार्‍यावर दोघांचे एकत्र फोटो काढले. त्यानंतर यातील आरोपीने वेळोवेळी आपल्या दोघांचे एकत्र काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल अशी धमकी देऊन फोन करून भेटण्यास बोलवत असे.डिसेंबर २०२० मध्ये तारीख आठवत नाही दुपारच्या दरम्यान सदर महिलेचे पती घरातून बाहेर गेल्याचे बघून आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन आरोपींनी फिर्यादी पिडीत महिलेसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तसेच त्याबद्दल कुणास काही सांगितले तर आपले फोटो व्हायरल करेल व दोघांचे लफडे आहे, असे सगळीकडे पसरवेल तसेच माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी देऊन महिलेला परत भेटायचे आहे, असे म्हणू लागला. त्यास सदर महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने पिडीतेची आई भाऊ बहीण यांना फोन करून त्रास देऊ लागला तसेच त्याचा मित्र तसेच पतीचे मित्र यांना देखील त्यांचे दोघांचे एकत्रित फोटो पाठवले.पिडीत महिलेने त्यास भेटायला नकार देत असल्याने मार्च २०२१ मध्ये नक्की तारीख आठवत नाही रात्री साडेनऊ वाजताचे दरम्यान पिडीतेचा मुलगा असे दोघेच घरी असताना यातील आरोपी शशांकने पाडीतेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेच्या कानाखाली मारली पिडीतेने त्यांची बदनामी होऊ नये, म्हणून त्याबाबत कोणास काही सांगितले नाही. त्यानंतर पिडीतेने आरोपी शशांक याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.

जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये दुपारी दोन वाजताचे दरम्यान नक्की तारीख आठवत नाही पिडीतेचा मुलगा एसटी स्टँड वरून घरी येत असताना यातील आरोपीने पाठलाग करून त्यांना रस्त्यात थांबवून सबंधीत महिलेशी बोलून थांबवण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरोपीशी बोलण्यास व भेटण्यास नकार दिल्याने दि.२४ नोव्हेंबर रोजी आरोपीने त्यांचे दोघांचा एकत्रित फोटो सदर महिलेचे पती यांचे ट्रू कॉलर एप्लीकेशन वर पाठवून त्यांचा फोटो व्हायरल करतो अशी आरोपीने फिर्यादीचे पतीस धमकी दिली आहे. सन २०२० पासून यातील आरोपी देत असलेल्या त्रासास कंटाळून आरोपीकडून फिर्यादीवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आल्याने आरोपी विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस ओतूर पोलीसांनी अटक करून मा. जुन्नर न्यायालयात  हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनवल्यामुळे सदर आरोपीची रवानगी येरवडा कारागृह येथे करण्यात आली आहे.पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव हे करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img