मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बस अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, यामध्ये 49 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी (9 डिसेंबर) रात्री झालेल्या या भीषण अपघाताचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते. पण, त्याचे मद्यप्राशन केल्याचीही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पण आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. (Kurla Bus Accident 5 dead police information about driver)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस चालक संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले आहे. तसेच, या बसमध्ये झालेल्या त्रांत्रिक बिघाडामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संजय मोरे हा सोमवारी पहिल्यांदाच बेस्ट चालक म्हणून काम करत होता. तो कंत्राटी चालक म्हणून 1 डिसेंबर रोजी बेस्टमध्ये रुजू झाला होता. त्यामुळे आता बेस्ट प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच, जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; अजित पवारांची टोलेबाजी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते. सदर घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे धावपळही झाली. दरम्यान, याप्रकरणी आता बस चालक संजय मोरे याला अटक झाली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात पेट्रोलिंगवर असलेले 4 पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यांच्यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आता कुर्ला पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
Kurla bus accident अपघातात मृत पावलेल्या नागरिकांची माहिती
विजय विष्णू गायकवाड (70 वर्षे)
आफ्रीन अब्दुल सलीम शहा (19 वर्षे)
अनम शेख (20 वर्षे)
कणीस फातिमा गुलाम कादरी (55 वर्षे)
शिवम कश्यप (18 वर्षे)