-3.5 C
New York

Devendra Fadnavis : उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं कारण काय ?

Published:

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीनंतर आता काही दिवसांपूर्वी स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली. राज्याचे नवीन सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकीकडे महाराष्ट्रातील राजकारणात मंत्रिमंडळाच्या हालचाली वेगात सुरु असताना दुसरीकडे एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. देशाच्या उद्योग क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव असलेले गौतम अदानी यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गौतम अदानी हे दुपारी १२.०० च्या सुमारास देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले. यानंतर साधारण दीड तास गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी गौतम अदानी यांनी राज्यातील उद्योग, विकासकामे याबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मेट्रो प्रकल्पांबद्दलही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गौतम अदानी हे त्यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही सदिच्छा भेट असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

स्थलांतरित कामगारांच्या रोजगार वाढसाठी का काम करत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Devendra Fadnavis गौतमी अदानीवर फसवणुकीचा खटला

उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात दरम्यान काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोपकरण्यात आला आहे. २५ कोटी डॉलरची लाच हे कंत्राट मिळवून देण्यासाठी दिल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचे वृत्त दिलं होतं. मात्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img