राज्याचे लक्ष आज मारकडवाडीकडे लागलेल आहे. इथल्या काही बांधवांचे फोन आम्हाला आले आणि त्यांनी असे सांगितले की, मारकडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्रासमोर जात आहे. (Gopichand Padalkar) मारकडवाडीतील लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हव आहे, असं त्यातून सांगितलं जातंय. बॅलेट पेपरवर मात्र, खरंच इथल्या लोकांना मतदान हवं आहे का? माविआला कोणी मतदान केलंय का? हे सर्वांना कळलं पाहिजे, म्हणून आम्ही मारकडवाडीत आलोत असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. ते मारकडवाडीत बोलत होते.
हे मारकडवाडी सर्वप्रथम कुणाल दिसलं. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचं गाव आहे. 90 टक्के येथे धनगर समाज राहतो. माझी जबाबदारी म्हणून वाढली आणि धनगरांनाच इथे पुढं का करण्यात आलं? लक्षात आलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या प्रक्रियेतून जी निवडणूक पार पडते त्याच्या विरोधात आहे, असं वातावरण निर्माण करण्याचं महापाप शरद पवार यांनी केला आहे. म्हणून आज आम्ही मारकडवाडी मध्ये आलोत असंही पडळकरत म्हणालेत.
शरद पवार 100 शकुनी मेल्यानंतर एक जन्माला आले आहेत. यांचं डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही, असं भासवण्यात आलंय. 100 गाव या विधानसभेत असताना माझ्याच मारकडवाडीला नेमकं कां पुढे करण्यात आलं? हे लक्षात घेतलं पाहिजे. सदाभाऊ खोत आणि मी म्हणून आज या तुमच्या गावात आलो. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांवरही घणाघाती टीका केली आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं कारण काय ?
Gopichand Padalkar नातवाचा राजीनामा घेतला पाहिजे
जे संसद भवन, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये डौलाने उभं आहे त्याच्या निर्मितीत धनगर समाजाचं योगदान आहे. होळकरांच्या रायसोनी ज्या जमिनी आहे त्या गावातल्या आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. शरद पवारांचा डाव उधळून आज या गावात म्हणुन टाकण्यासाठी मी आलो आहे. जर काही घडलं असेल तर शरद पवारांनी आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा पहिले राजीनामा घेतला पाहिजे असा घणाघातही त्यांनी केला आहे.
जयंत पाटील येथे येऊन गेले त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पहिल्यांदा राजीनामा या तिघांचा घेतला पाहिजे आणि त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. तसंच, राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. राज्यातील प्रस्थापितांना म्हणून आपल्याला उधळून लावावे लागेल असेही ते म्हणले.