-0.5 C
New York

Kurla bus accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट

Published:

मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसने अनेकांना धडक दिल्याने या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी 48 ते 50 जण झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून (Kurla bus accident) अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला अटक करण्यात आली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर देखील दाखल करण्यात आला आहे.

आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर, कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद आहे. दरम्यान, कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. त्यामध्ये बस चालक संजय मोरे हा (दि. १ डिसेंबर) रोजी चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे.तसंच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलंही मोठं वाहन चालवलेलं नाही. त्यामुळे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमकं कोण?, पोलीस तपास सुरू आहे.

कुर्ला बस अपघाताचं कारण काय? नेमका कसा झाला हा अपघात

Kurla bus accident कुटुंबियांचा वेगळाच दावा?

घाटकोपरच्या असल्फा विभागाचा संजय मोरे हे बस चालक रहिवासी आहे. वाहन चालक म्हणून अनेक वर्षे काम करीत आहेत. लॉकडाऊननंतर बेस्टमध्ये कंत्राटमध्ये ते कामाला लागले. तेव्हा पासून संजय मोरे बेस्टच्या बस चालवतात. 10 दिवसांपूर्वी ही मोठी इलेक्ट्रीक बस त्यांनी चालवयला सुरवात केली होती. त्याची देखील 10 दिवस त्यांनी ट्रेनिंग घेतली होती. संजय मोरे कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाहीत, बसमध्ये काही तांत्रिक घडले असावे असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत १ डिसेंबरला संजय मोरे हा चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img