9.3 C
New York

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे 1500 रुपये बंद होणार?

Published:

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यात लाडक्या बहि‍णींचा (Ladaki Bahin Yojana) मोठा वाटा असल्याचं मत देखील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहि‍णींना दरमहा 2100 रूपये दिले जाणार असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु आता या योजनेसंदर्भात मोठं अपडेट समोर (Maharashtra Politics) येतंय. लाडकी बहीण योजनेच्या निकषांबद्दल मोठं अपडेट समोर आलंय.

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी केली जाणार असल्याची माहिती समोर येतेय.योजनेच्या निकषांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, (Ladaki Bahin Yojana Verification Criteria) एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतेय का?, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेत का, या पाच बाबींचा समावेश आहे. या निकषांमध्ये बसत नसणाऱ्या संबंधित महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती समोर येतेय.

मोठी बातमी! विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर

सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रूपयांची आर्थिक मदत केली जाते, ही मदत 2100 रूपये केली जाईल, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. अर्थसंकल्पात देखील यासंबंधी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याअगोदर आता अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. परंतु केवळ तक्रार प्राप्त झालेल्याच अर्जांची छाननी केली जाईल, असं सांगितलं जातंय. सध्या 2 कोटी 34 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

वेळेअभावी निकषांची तपासणी होवू शकली नाही, अशी प्रतिक्रिया अनेक अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात जवळपास 1 कोटींहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रूपयांपेक्षा कमी कसे, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या अर्जांची फेरपडताळणी होणार आहे. 1 एप्रिलनंतर लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रूपये मिळतील, अशी माहिती समोर येतेय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img