-0.9 C
New York

Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी राऊतांचं मानसिक संतुलन काढलं; म्हणाल्या

Published:

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान आता राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी (Sanjay Raut) मात्र या योजनेवर टीका सुरू केलीय. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार असल्याचं वृत्त समोर आलंय.

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी मात्र निवडणूक झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. 1500 रुपयांना मतं विकत घेतली, आता बहिणींचे दिलेले पैसे परत घेऊ नका अशी टीका संजय राऊत यांनी केलाय. यावरून मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (BJP Leader Chitra Wagh) संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय.

माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. काही पुरुषांनी फॉर्म भरून पैसे घेतले आहे. 5 महिन्यांत पुरुषांनी किंवा डुप्लिकेट फॉर्म समोर येत (Maharashtra Politics) आहे. संजय राऊतांना ही लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, पण आम्ही होऊ देणार नाही. संजय राऊत जे बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

एकनाथ शिंदेंकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन

तसेच मेट्रोच्या कामासाठी झाडे तोडण्यात येणार आहेत. 1400 रूपयांप्रमाणे झाडांची किंमत देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. या पद्धतीने झाडांची कत्तल होऊ नये, म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत. परंतु मेट्रोच्या कामासाठी हे करावं लागत असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिलीय.

मारकडवाडी संदर्भात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मारकडवाडीची टक्केवारी ही बावनकुळे यांनी मांडली आहे. जी लोक बसली होती, ती बाहेरून आणलेली माणसे होती. महायुतीच्या यशामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. त्यातून ते बाहेर आलेले नाही. महाराष्ट्राच्या जनतेने विरोधी पक्ष नेते पद मिळू नये, असं केलं असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img