8.2 C
New York

Sharad Pawar : तुमच्याच गावात जमावबंदी का केली? शरद पवारांचा मारकडवाडीतील ग्रामस्थांना सवाल

Published:

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झालाय. या पराभवाचं खापर मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर (EVM) फोडलं, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. मारकडवाडीत देखील आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar) मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, त्यांच्यासोबत संवाद साधला आहे.

यावेळी (Markadwadi) ग्रामस्थांनी बोलताना शरद पवार म्हणाले की, मारकडवाडी गावात मॉक पोलिंग म्हणजेच बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान हे घेण्यात येणार होतं. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी देखील पूर्ण झाली (EVM and Ballot Paper) होती. परंतु, मतदानाच्या दिवशी गावात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली.त्यामुळे मॉक पोलिंग झालं नाही.तुमच्याच गावामध्ये तुम्हालाच जमावबंदी, हा कोणता कायदा आहे? असा सवाल शरद पवार यांनी मारकडवाडीत बोलताना ग्रामस्थांना केलाय.

या वयात ‘असा’ खोटारडेपणा करायचा? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर वार”

शरद पवार म्हणाले की, आपल्या देशाने ईव्हीएम पद्धत स्वीकारली आहे, परंतु या पद्धतील बदल केला पाहिजे. मारकडवाती मतदान पार पडल्यानंतर ग्रामस्थांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे गावात पु्न्हा बॅलेट पेपर मतदान घ्यावं, असं गावाने ठरवलं. मग याला पोलिसांनी विरोध का केला? तुमच्याच गावामध्ये जमावबंदी का केली? गावाने एका नव्या दिशेने जायचे ठरवल्यानंतर विरोध का? असे अनेक सवाल शरद पवारांनी विचारले आहेत.

पवार मारकडवाडीत बोलताना म्हणाले की, राज्यसभा-लोकसभेत आम्हाला अनेक खासदार भेटतात. ते तुमच्या गावाची चर्चा करतात. हे गाव कुठे आहे, असं विचारतात. यावरून पवारांनी मारकडवाडी गावाचं अभिनंदन देखील केलंय. ईव्हीएमसंदर्भात लोकांच्या मनात शंका का निर्माण झाली? यावेळी शरद पवार म्हणाले की, अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला. आज जगातला सर्वात मोठा देश असलेल्या अमेरिकामध्ये ईव्हीएम वापरले जात नाही. युरोप खंडातील सर्व देश ईव्हीएम वापरत नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img