रक्तदान एक महान कार्य समजले जाते. (Blood donation) रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते. रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचेतरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्म-समाधानही मिळते. दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाला महत्त्व दिले जाते. अनेकदा जवळच्या नातेवाइकासाठी धडधाकट असलेले आप्तस्वकीय रक्तदानासाठी मागे पुढे पाहतात.
समाजात अजूनही रक्तदानाबद्दल अनेक गैरसमज आहेत. मात्र, शहरातील दहा जण आजही स्वेच्छाने रक्तदान करतात. याचे महत्त्व लक्षात ठेऊन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने अनेक नागरिकांनी यात शिबिरात त्यांचा सहभाग दर्शवला. या शिबिराला HDFC बँकेने विशेष सहकार्य केले.
तसेच या शिबिरात सर. जे. जे. रुग्णालय रक्तपेढी जसलोक रुग्णालय रक्तपेढी,सर. जे. जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढी, सायन रुग्णालय रक्तपेढी,के. ई. एम. रुग्णालय रक्तपेढी, एस. एल. रहेजा रक्तपेढी, वाडिया रुग्णालय रक्तपेढी या सर्व रक्तपेढी सहभागी झाले होते.या शिबिरात अध्यक्ष श्री. किरण तावडे, सरचिटणीस श्री. स्वप्निल परब, खजिनदार श्री. नितेश महाडेश्वर यांचे मोलाचे योगदान लाभले.