-0.9 C
New York

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळणार?, काय आहे नक्की विषय?

Published:

विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. प्रोटेम स्पीकर नवनिर्वाचित 288 आमदारांना शपथ देत आहेत. विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून त्यादरम्यान नवीन सभापतींची निवडही होणार आहे. (Eknath Shinde) हंगामी सभापती कालिदास कोळंबकर नवीन आमदारांना शपथ दिली आहे. नूतन सभापतींची निवड 9 डिसेंबरला होणार आहे.

Eknath Shinde मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख

विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

Eknath Shinde विस्ताराबाबत महायुतीची बैठक

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीची मोठी बैठक होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कॅबिनेट खात्यांबाबत चर्चा होणार आहे. यानंतर 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहखात्याची मागणी केल्याचा दावा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला असून, विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे.

विधानसभेत महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथ घेण्यास नकार; काय आहे कारण?

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 11 ते 16 डिसेंबर दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नागपुरात 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, फडणवीस म्हणाले आहेत की, कोणताही वाद नाही. तिन्ही पक्षांना योग्य तो मान देण्यात आला आहे. गृहखाते आपल्याकडेच राहणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असंही ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde गृहमंत्रालयाची मागणी

एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय हवं असून भाजप त्यांना गृहमंत्रालय देण्यास तयार नाही, अशी चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या पुन्हा पुन्हा चर्चेत आहेत. शिंदे यांचे नेतेही उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, गृहमंत्रालयाकडे मागणी केली आहे, निर्णय तिघांनी घ्यायचा आहे, बघू काय होते ते. अजित पवारांचा पक्ष युतीत आल्याने आपल्या पक्षाचे नुकसान झाले आहे अशीही सध्या जोरात चर्चा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img