19.1 C
New York

Legislature Special Session : आता विशेष अधिवेशन, हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार?

Published:

पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Legislature Special Session) फडणवीस सरकारच्या कामकाजाला त्यानंतर आता सुरुवात झाली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून 9 डिसेंबरपर्यंत बोलावण्यात आलं आहे. नवनिर्वाचित आमदारांचा या विशेष अधिवेशन काळात शपथविधी पार पडणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे सर्व नवनिर्वाचित आमादारांना शपथ देणार आहेत. तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षाचे नेते उदय सामंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं सांगितलं आहे.

Legislature Special Session उदय सामंत काय म्हणाले?

सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. विरोधक नसले तरी आम्ही त्यांचा आदर करतो. मतदार यांच्यामुळे तेवढे आमदार आले. तो जनतेचा कौल आहे. विधानसभेचे अध्यक्ष निर्णय आहे. विचार करु म्हणाले पण आज ते आले नाही. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य आहे, असं उदय सामंत म्हणाले.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना दिलासा; आयकर विभागाकडून जप्त मालमत्ता मुक्त

Legislature Special Session हिवाळी अधिवेशन कधी सुरु होणार?

विधिमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशव पार पडल्यानंतर हिवाळी अधिवेशन होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 12 डिसेंबरपासून नागपुरात विधानमंडळ सचिवालयाचं काम सुरु होणार आहे. नागपुरात विधानसभा आणि विधान परिषदेचं सभागृह सुसज्ज करण्याचं काम सुरु झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img