7.6 C
New York

Mahayuti : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

Published:

महायुतीचे (Mahayuti) नवे सरकार महाराष्ट्रात 5 डिसेंबरला सत्तेवर आले आहे. निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडल विस्ताराचे वेध महायुतीच्या नेत्यांना लागले आहे. तत्पुर्वी आजपासून (7 डिसेंबर) विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आज नवनिर्वाचित आमदारांना आज शपथ दिली जाईल.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, 30 ते 32 आमदार मंत्रीपदाची शपथ नवीन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात घेऊ शकतात. यामध्ये 15 भाजपचे , 8 शिवसेनेचे आणि 7 ते 9 आमदार राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. एकूण 21 मंत्रिपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवारांच्या 10 मंत्रिपदे राष्ट्रवादीला मिळू शकतात.

अभुतपूर्व 132 जागां निवडणुकीत भाजपने जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडे काही निवडक आणि महत्त्वाची खाती असतील. यात गृह खाते, गृहमंत्री बांधकाम, सरकारी शिष्टाचार, ऊर्जा, कायदा व न्याय, ग्रामविकास, पाटबंधारे, महसूल, पर्यटन, कौशल्य विकास, आदिवासी आदी विभागांचा समावेश असल्याचेही स्पष्ट दिसते आहे. यासोबतच भाजप आपल्याजवळ सामान्य प्रशासन विभागही ठेवू शकते, अशी माहिती आहे.

Mahayuti शिंदे गट- अजित पवार गटाला काय मिळणार?

उत्पादन शुल्क, पर्यावरण, सामाजिक न्याय, नगरविकास, खाणकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योग, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला मिळण्याची शक्यता आहे. तर अन्न व पुरवठा, एफडीए, वित्त व नियोजन, महिला व बालविकास, क्रीडा व युवक कल्याण, कृषी व पुनर्वसन ही खाती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात.

अनेक विक्रम नोंदवत फडणवीस पवारांच्या रांगेत; ‘मी पुन्हा येईल’ ची Inside Story

Mahayuti किती मंत्री घेणार शपथ?

मुख्यमंत्र्यांसह 21 मंत्र्यांची शपथ सध्या महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून घेण्याची शक्यता आहे. याशिवाय 11 ते 12 शिवसेनेचे आणि 9 ते 10 राष्ट्रवादीचे मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, एक-दोन दिवसांत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संख्या आणि नावे निश्चित होतील, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनात विशेष विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झालेले कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. 9 डिसेंबर म्हणजेच सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे, त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाला नवीन सरकारला सामोरे जावे लागेल. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला राज्यपाल देखील संबोधित करतील. . यानंतर 16 डिसेंबरपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img