13.7 C
New York

Otur : बिबटपासून सुरक्षेसाठी मेंढपाळांना सौर दिवे व तंबूचे वाटप

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.६ डिसेंबर ( रमेश तांबे )

जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून (Otur) नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण,नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून त्याकरिता जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी त्यांच्यासाठी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली.


वन विभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल उचलले असून,जुन्नर वनविभागातील शासकीय निधी उपलब्ध करत मेंढपाळांना राहण्यासाठी चारशे सौर दिवे आणि चारशे तंबू खरेदी केले असून, मेंढपाळांना सौरदिवे आणि तंबूचे वाटप करण्यात येत आहेत. सर्व तंबू आणि सौर दिवे उपलब्ध झाले असून  पहिल्या टप्प्यात जुन्नर तालुक्यात ८५ सौर दिवे व तंबूचे वाटप पूर्ण झाले असून,उर्वरित तंबू व सौर दिवे मेंढपाळांना  आता उपलब्ध करून दिले जात आहेत असे श्री सातपुते यांनी सांगितले.


सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला,सर्पदंश तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे ओतूरचे वनपरिक्षेत्राधिकारी लहू ठोकळ म्हणाले की, शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी आळे, पिपंरी पेंढार, उंब्रज, वडगांव आनंद, बेल्हे, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, येडगाव, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगांव कांदळी,येथील वास्तव्यास असलेल्या शिवराम बुधा करगळ,लालु पांगरु पोकळे, अविनाश बंडु तांबे,गोरेक बाबाजी कोळेकर, काळूराम गजानन करगळ,रोहिदास धुळा करगळ,साळू राम धुळा करगळ,बाळु साळू राम कऱ्हे,गंगा राम महादू कऱ्हे, हनुमंत पोपट माने, शिवाजी बाळु कोळेकर, पुना कोकरे, वसंत लक्ष्मण चक्कर,नारायण बाळु कोळेकर,तुकाराम महादू करे,  सहादू पावसु खरात,पांडुरंग बाबाजी देवकर,भास्कर खंडू दुबे, काळू राम नाथा घुले,अंकुश तुळशीराम जानक,किसन भाऊ साहेब चीतळकर,संतोष तुकाराम तोंडे,चिमाजी भागु सोनार,  दामु हिरामण खरात,भानुदास बुधा करगळ व इतर अशा एकुण ५५ मेंढपाळांना सौर दिवे व तंबूचे वाटप श्री सातपुते यांच्या हस्ते करणेत आले. सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक वनरक्षक कैलास भालेराव,वनपाल संतोष साळुंके, वनरक्षक विशाल गुंड यांनी करून दाखवले यावेळी  वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर, रेस्क्यू टीम मेंबर संतोष कुतळ, रोशन भोर,रवी केदार ,खंडू वामन आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img