5.5 C
New York

Mahayuti : महायुतीचं सुत्र ठरलं! मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आली समोर

Published:

राज्यात आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. पण आज केवळ तिघांचाच शपथविधी होणार असल्याचं समोर आलंय. तर नव्या फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शपथविधीच्या घडामोडी सुरु असताना आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion of Mahayuti Government) 11 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळते. या मंत्रिमंडळ विस्तारात इतर मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर आलीय. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी 33 जणांचा शपथविधी होईल, असं देखील समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आज राज्याचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. तब्बल तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर बसत आहेत.

एकनाथ शिंदेंचा काळ संपला, पक्षही फुटू शकतो; संजय राऊतांनी दिला इशारा

नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबर दरम्यान होणार आहे. याअगोदर मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर 11 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी (अजित पवार) 8 नेते, शिवसेना (एकनाथ शिंदे गटातील) 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, असं समोर आलंय. यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन मंत्रीमंडळामध्ये दोन उपमुख्यमंत्र्‍यांसह 33 जणांचा समावेश असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस पूर्ण झालेत. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय. त्यामुळे आज महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील सत्ता स्थापनेचा पेच लवकर सुटला नसल्याचं दिसतंय. महायुतीमध्ये गृहखात्यावरुन पेच निर्माण झालेला बघायला मिळत आहे. तर एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यावर दावा केला होता. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा तब्बल दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस रखडला. दरम्यान तीन दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती सोशल मीडिया पोस्ट करून दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img