राज्यात आज महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra CM Oath Ceremony) पार पडणार आहे. आजपासून महाराष्ट्रात ‘देवेंद्र पर्व’ला (Devendra Fadnavis) सुरूवात होणार आहे. आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीसंदर्भात भूमिका स्पष्ट झालेली नाही. या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आमंत्रित करण्यात आलंय.फडणवीस- अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर शरद पवार यांच्यानंतर तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री होणारे शरद पवार दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. तर अजित पवार सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सहावेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हेच एकमेव नेते आहेत. त्यांनी अर्थ आणि जलसंपदा खात्याचा कारभार देखील सांभाळलेला आहे. या शपथविधी सोहळ्याआधी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय.
अजितदादांच्या नावावर नवा रेकॉर्ड; सलग सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
फडणवीसांच्या शपथविधीसाठी आझाद मैदान सज्ज झालंय. या मैदानावर तीन व्यासपीठं देखील उभारण्यात आली आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची आसनव्यवस्था आहे. आझाद मैदानात पालिका प्रशासनाकडून सेवा- सुविधा देखील उपलब्ध केल्या जाणार आहेत. महायुतीकडून काल राज्यपालांना पत्र देत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. सं रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याचं समोर आलंय. या बैठकीत गृहमंत्रिपदासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे.